कुलवृत्तांत

  • प्रस्तावना
  • संक्षिप्त कुलवृत्तांत
  • ऑनलाईन कुलवृत्तांत
असे म्हणतात की इतिहासाकडून शिकायचे असते, त्यावरून निघालेल्या अनुमानाप्रमाणे वर्तमानात आचरण करून उज्वल भविष्य घडवायचे असते. त्यासाठीच आपल्या कुलाचा इतिहास लिहून ठेवायची पद्धत मुख्यत्वे करून चित्पावन समाजात पूर्वापार चालत आलेली आपल्याला दिसते. अनेक घराण्यांचे कुलवृत्तांत आपण आज बघतो. ते बनवत असताना बर्‍याच तपशीलांचा सखोल अभ्यास केलेला असतो. उदाहरणादाखल आपण खालील तीन मुद्यांचा विचार करू.

  • १. आजही आपण आपल्या कुलदैवताच्या दर्शनाला गेलो की दक्षिणा देऊन पावती बनवतो तेंव्हा नकळतपणे तिथे आपल्या उपनामाची नोंद होत असते.
  • २. दिवंगत व्यक्तीच्या श्राद्धाचे वेळी मागच्या तीन पिढ्यांची नावे घेणे हे देखील अप्रत्यक्षपणे कुलाचा इतिहास लिहीणेच होय. अश्या सर्व नोंदी एकत्रितपणे मिळाव्यात म्हणून प्रत्येक कुळाचे उपाध्याय ठरलेले असत व तेच उपाध्याय त्र्यंबकेश्वरी श्राध्द विधीं करता योजिले जात असत.
  • ३. एका कुलामधील कुळाचार व कुळधर्म हे सहसा समान असतात.

त्यामुळे निरनिराळ्या देवस्थानांकडील नोंदी, त्र्यंबकेश्वर येथील पुरोहितांकडील दप्तरे किंवा चोपड्या आणि प्रचलित असलेले कुळधर्म व कुळाचार याचा आधार घेऊन निष्कर्ष काढायची पद्धत होती व त्यायोगे तयार झालेला कुलवृत्तांत अथवा कुलग्रंथ हा एक संदर्भग्रंथ म्हणून समजला जात असे. चित्पावन मोडक कुटुंबियांचा कुलग्रंथ इ. स. १९४६ मध्ये प्रसिध्द झाला होता. तो बनवत असताना आलेल्या अडचणी व अनुभव त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत बघायला मिळतात. नंतर त्या ग्रंथाचे नूतनीकरण आजतागायत झालेले नाही. बदलत्या परिस्थितीनुसार छापील आवृत्ती खेरीज संकेत स्थळावरील या पर्यायाद्वारे आपण अद्ययावत 'मोडक कुलवृत्तांता' पर्यंत पोहोचू शकता.
१९४६ सालच्या उपलब्ध कुलवृत्तांतातून संकलित केलेली माहिती                  -->                  जुन्या कुलवृत्तांताचा सारांश (काम चालू आहे)
घराणे क्र. व नाव
सारांश माहिती
वैयक्तिक माहिती
वंशावळ व छायाचित्रे
घराणे ०१ - देसाई, खोत, महाजन कुलवृत्तांत   वंशावळ  /  जुनी छायाचित्रे
घराणे ०२ - बोरनार वांबरूड-पुणे कुलवृत्तांत   वंशावळ  /  जुनी छायाचित्रे
घराणे ०३ - वेतोशी कुलवृत्तांत   वंशावळ
घराणे ०४ - ग्वाल्हेर कुलवृत्तांत   वंशावळ
घराणे ०५ - पडघवली-अवचितगड कुलवृत्तांत वंशावळ  /  जुनी छायाचित्रे
घराणे ०६ - देशमुख काम चालू आहे   वंशावळ
घराणे ०७ - बोरसद कुलवृत्तांत   वंशावळ  /  जुनी छायाचित्रे
घराणे ०८ - बेलवाडी कुलवृत्तांत   वंशावळ  /  जुनी छायाचित्रे
घराणे ०९ - बोरघर-चिंचवली कुलवृत्तांत   वंशावळ
घराणे १० - नातू पालवण कुलवृत्तांत   वंशावळ
घराणे ११ - भट कुलवृत्तांत वंशावळ  /  जुनी छायाचित्रे
घराणे १२ - विनोद कुलवृत्तांत वंशावळ - काम चालू आहे /  जुनी छायाचित्रे
घराणे १३ - रेश्मीकर काम चालू आहे   वंशावळ  /  जुनी छायाचित्रे
घराणे १४ - मुधोळ कुलवृत्तांत   वंशावळ
घराणे १५ - शिरहट्टी कुलवृत्तांत   वंशावळ  /  जुनी छायाचित्रे
घराणे १६ - देवाचे गोठणे काम चालू आहे   वंशावळ  /  जुनी छायाचित्रे
घराणे १७ - वाकरुळ-इंदूर कुलवृत्तांत   वंशावळ
घराणे १८ - गूळसुंदे कुलवृत्तांत   वंशावळ  /  जुनी छायाचित्रे
घराणे १९ - महिदपूर-इंदूर कुलवृत्तांत   वंशावळ
घराणे २० - नागपूर १ काम चालू आहे   वंशावळ - काम चालू आहे
घराणे २१ - नागपूर २ कुलवृत्तांत   वंशावळ
घराणे २२ - कल्याण कुलवृत्तांत   वंशावळ - काम चालू आहे
घराणे २३ - शेवडे कुलवृत्तांत   वंशावळ - काम चालू आहे
घराणे २४ - कुटुंबशास्त्री कुलवृत्तांत   वंशावळ - काम चालू आहे
घराणे २५ - चिंदर-त्रिंबक कुलवृत्तांत   वंशावळ - काम चालू आहे  / जुनी छायाचित्रे
घराणे २६ - मसुरे कुलवृत्तांत   वंशावळ - काम चालू आहे  /  जुनी छायाचित्रे
घराणे २७ - नेरूर कुलवृत्तांत   वंशावळ
घराणे २८ - सोंदा कुलवृत्तांत   वंशावळ
घराणे २९ - कोहीळ कुलवृत्तांत   वंशावळ
कृपया ऑनलाइन कुलवृत्तांत पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
ऑनलाइन कुलवृत्तांत

ऑनलाइन कुलवृत्तांत आपले नाव शोधण्यासाठी घराणे क्र. माहित असणे गरजेचे आहे. तो शोधण्यासाठी घराणे शोधा लिंक वर क्लिक करा.


ऑनलाइन कुलवृत्तांत पाहण्यासाठी आपल्याला मार्गदर्शक ठरतील अशी काही माहिती खाली दिली आहे
     १. ऑनलाइन कुलवृत्तांत पाहण्यासाठी नवीन वापरकर्ता खाते उघडण्याच्या माहितीसाठी  New User Creation Guide  लिंक वर क्लिक करा.
     २. ऑनलाइन कुलवृत्तांतामध्ये तुम्हाला आवश्यक व्यक्ती शोधण्याच्या माहितीसाठी  Search Family Member  लिंक वर क्लिक करा.